दुष्काळग्रस्त भागातून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या गरजू विद्यार्थ्यांकरिता स्टुडंट्स ग्रुपच्या वतीने ‘पुण्याचा डबा’ या उपक्रमांतर्गत सवलतीच्या दरात सकाळी व रात्रीच्या जेवणाचे डबे दिले जाणार आहेत. या उपक्रमात दोन वेळच्या डब्यांसाठी प्रति महिना ९५० रूपये तर एक वेळच्या डब्यासाठी ५५० रूपये शुल्क निश्चित करण्यात आल्याची माहिती महेश देशपांडे यांनी दिली.
२१ एप्रिलपासून सुरुवातीला सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना दररोज दोन्ही वेळचे डबे पोचविण्यात येणार आहेत. तसेच वसतिगृह आणि महाविद्यालयांमध्ये डबे पोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून ०२०-२५३९४४८८, ९७६३३५४१७३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

Story img Loader