पुण्यातील टिळक रोड येथील एका इमारतीतील घरात आग लागली असून अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या शाखा असलेल्या इमारतीत ही आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

टिळक रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा असलेल्या इमारतीतील एका फ्लॅटमध्ये बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आग झपाट्याने पसरत गेल्याने काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अग्निशमन दलाचे पाच बंबांनी घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या आगीत बँकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही.