पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे या ठिकाणी स्पार्कल कॅण्डलच्या कारखान्याला भीषण आग लागून जागीच सहा महिला कामगारांचा मृत्यू झाला होता. इतर गंभीर जखमी कामगारांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उषा पाडवी (वय-४०) यांचे आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास निधन झालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळवडे आगीच्या घटनेतील मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. घटनेमध्ये गंभीर जखमी असलेल्या शरद सुतारला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. शरद सुतार हा शिवराज एन्टरप्रायजेस कंपनीचा मालक आहे. त्याच ठिकाणी स्पार्कल कँडल बनवल्या जात होत्या.

हेही वाचा – कापूरहोळ-सासवड रस्त्यावर भीषण अपघात; दोन वर्षांचे बालक बचावले… पण आईसह मोटारचालकाचा मृत्यू

हेही वाचा – पुणे: शरीरसंबंधास विरोध केल्याने महिलेचा खून; दोघे गजाआड

जखमींना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील प्रतीक्षा तोरणे, कविता राठोड, शिल्पा राठोड, प्रियंका यादव, अपेक्षा तोरणे, कमल चौरे, सुमन गोधडे आणि आज उषा पाडवी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा आता १४ वर पोहोचला आहे. दरम्यान, नातेवाईकांच्या विनंतीनंतर घटनेतील जखमी रेणुका ताथोड यांना ससून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना पुढील उपचारासाठी नातेवाईकांनी अमरावती या ठिकाणी नेले आहे. घटनेतील गुन्हा दाखल असलेला जखमी शरद सुतार याला देखील ससून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Till now 14 people died in talwade incident accused sharad sutar was taken into custody by the police kjp 91 ssb