शहरातील वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच मार्गदर्शक सूचनांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रभागनिहाय विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. महापालिकेने नव्याने लागू केलेल्या उपाययोजनांतर्गत महापालिका कार्यक्षेत्रातील ३२ प्रभागांमध्ये एकूण १६ विशेष वायु प्रदूषण देखरेख पथक तैनात करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या पथकांमध्ये उपअभियंता, स्वच्छता निरीक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि एमएसएफ कर्मचारी यांचा समावेश आहे.

वायू प्रदूषण नियंत्रण पथकाचे प्राथमिक कर्तव्य त्यांच्या संबंधित प्रभागातील बांधकाम स्थळांना भेट देणे, फोटो किंवा व्हिडिओग्राफीद्वारे त्याची नोंद घेणे, यादरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदींचे पालन न केल्याचे उघड झाल्यास  दंड आकारणे, नोटिस जारी करणे किंवा कामाची जागा सील करून दंडात्मक कारवाई करणे हे असणार आहे. नोटीस बजावलेल्यांची संख्या, वसूल केलेला दंड आणि दररोज होणाऱ्या कारवाईची या पथकांद्वारे नोंद ठेवण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६, वायू (प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ नुसार नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

if want vote then Save rivers trees and hills
मत हवं? नद्या, झाडे, टेकड्या वाचवा…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

हेही वाचा >>> शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या वेतनाची कागदपत्रे सादर करणे अनिवार्य

महापालिकेने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खाजगी आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या बाजूने हिरवे कापड तसेच ज्यूट शीट ताडपत्रीने कव्हर करणे बंधनकारक असणार आहे. बांधकाम पाडताना त्यावर सलग पाणी फवारणे शिंपडणे तसेच काम सुरू असताना त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य लोडींग अनलोडींग दरम्यान पाणी फवारले जाईल याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच या उपाययोजनांसाठी जवळच्या महापालिका सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करावा.

शिवाय, शहरातील बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, सेन्सरवर आधारित वायू प्रदूषण मॉनिटर्स बसविणे आणि बांधकाम कर्मचार्‍यांसाठी वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे वापरणे यावरही भर दिला जाणार आहे.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, घनकचऱ्यासह इतर कोणत्याही प्रकारचा कचरा उघड्यावर जाळण्यास सक्त मनाई असून नागरिक स्मार्ट सारथी अॅपमध्ये दिलेल्या पोस्ट अ वेस्ट या सुविधेद्वारे अशा घटनांची तक्रार करू शकतात. विशेषत: कचरा डंपिंग ग्राउंड आणि संभाव्य कचरा जाळण्याच्या ठिकाणीही उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी लागू करण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एन.जी.टी) निर्देशांनुसार तसेच सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या (१२ नोव्हेंबर २०२२ रोजीचा आदेश) निर्देशांनुसार फटाके वाजविण्यासही फक्त रात्री ७ ते १० दरम्यान परवानगी देण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये काँग्रेसचा जण आक्रोश मोर्चा! जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्याची मागणी

वाहतूक विभाग आणि वाहतूक अधिकाऱ्यांना वाहन उत्सर्जन नियमांची अंमलबजावणी करणे, वैध प्रदूषण नियंत्रण (पीयुसी) प्रमाणपत्र सुनिश्चित करणे आणि वाहनांच्या ओव्हरलोडिंगचे निरीक्षण करणे बंधनकारक असणार आहे.

शहरातील ढाबा, बेकरी, रेस्टॉरंट आणि हॉटेल्स मालकांनी स्वयंपाकघरात पर्यावरणपूरक पर्यांयांचा वापर करावा तसेच डिझेल जनरेटरचा वापर करण्याचे शक्यतो टाळावे. शहरातील हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उद्योगांच्या वायू प्रदूषणावरही बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. या सर्व निर्देशांची अंमलबजावणी विविध पर्यावरणीय कायदे आणि नियम लक्षात घेऊनच करण्यात आली असून याचा उद्देश हवेची गुणवत्ता वाढविणे तसेच शहराचा एकूण पर्यावरणीय विकास करणे हा आहे.

शहरातील हवा प्रदुषण रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमधील महत्वाचे मुद्दे

– ३२ प्रभागात १६ वायू प्रदुषण नियंत्रण पथके तैनात

– निर्देशांचे पालन न केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई

– उंच बांधकाम इमारतीसाठी ३५ फूट टिन किंवा मेटल शीट अनिवार्य

– बांधकामाच्या ठिकाणी हिरवे कापड आणि ताडपत्रीचा वापर

– बांधकाम करताना धुलीकण हवेत पसरू नये म्हणून पाणी शिंपडणे

– उघड्यावर कचरा जाळण्यावर बंदी

– स्मार्ट सारथी अॅपद्वारे नियमांचे उल्लंघण करणाऱ्यांवर कारवाई

– फटाके वाजविण्यावर मर्यादित वेळ

– वाहनांची पीयुसी प्रमाणपत्र पडताळणी

– ईव्ही बसेसची संख्या वाढविण्यावर भर

– डिजेल जनरेटरच्या वापरावर नियंत्रण – दैनंदिन वायू प्रदूषण निरीक्षण