पुणे : कला संचालनालयातर्फे एलिमेंटरी, इंटरमिजिएट या चित्रकला परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान या परीक्षा होणार असून, ऑनलाइन नोंदणीसाठीची अंतिम मुदत २१ ऑगस्ट आहे. कला संचालनालयाच्या वेळापत्रकानुसार एलिमेंटरी, इंटरमिजिएट या परीक्षांसाठी १४ ते २१ ऑगस्ट या कालावधीत केंद्रांची नोंदणी, केंद्रांची माहिती अद्ययावत करण्यात येईल. १४ ते २५ ऑगस्ट या कालावधीत शाळांना नोंदणी करता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या परीक्षांसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी २१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. एलिमेंटरी परीक्षा ४ आणि ५ ऑक्टोबर, तर इंटरमिजिएट परीक्षा ६ आणि ७ ऑक्टोबरला होणार आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी करताना दोन्हीपैकी एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील नावाप्रमाणेच अचूक नावाची ऑनलाइन नोंदणी करावी. विद्यार्थ्यांची नोंदणी आणि परीक्षा शुल्क  http://www.doa.maharashtragov.in या संकेतस्थळाद्वारे करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले.