लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : भारतीय जनता पक्षाने निवडणूक रोखे आणि अन्य माध्यमातून पैसे जमवले आहेत. मात्र जनतेचा प्रतिसादच मिळत नसल्याने भाजपकडून निवडणूक वाचवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात पैसे वाटपाचा मारा करण्यात येत आहे. पैसे वाटण्याशिवाय भाजपकडे दुसरे तंत्र राहिलेले नाही, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केला. भाजपाने पैशाचा कितीही वापर केला, कितीही पैसे वाटले तरी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीलाच महाराष्ट्रात बहुमत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार अभिजीत वंजारी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ता गोपाळ तिवारी या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-राज्यातील ९२.६८ टक्के नवसाक्षर उत्तीर्ण; ३३ हजार ६२७ नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक
चव्हाण म्हणाले, की निवडणुकीच्या सुरूवातीला भाजपाने ३७० पारची घोषणा दिली. मात्र संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट असल्याने ही घोषणा आता हवेतच विरली आहे. नरेंद्र मोदी यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलावे लागत आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जे लिहिलेले नाही, त्यावर भाजप बोलत आहे. मोदींच्या सभांना गर्दी होत नाही, प्रतिसाद मिळत नसल्याने पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ येत आहे. भाजपकडून ही निवडणुक हिंदू विरूद्ध मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र महाराष्ट्रात त्यांचा प्रयत्न यशस्वी होताना दिसत नाही. या मातीत फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार आहेत. त्यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत.
काळ्या पैशाबाबत सरकारकडे सर्व पुरावे आहेत. पण ते संबंधितांकडे जाऊन तोडपाणी करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी ‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ कशाच्या जोरावर म्हणतात, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. निवडणूक रोखे हा सर्वांत मोठा भ्रष्टाचार आहे. त्यासाठी मोदी सरकारने कंपनी कायद्यातही बदल केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदा ठरवल्याने हा बदल रद्द करणे आवश्यक आहे. तसेच भाजपने त्यांना मिळालेले पैसे निवडणूक आयोगाकडे जमा करणे आवश्यक आहे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.
आणखी वाचा-बारामती मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या १५० हून अधिक तक्रारी!
म्हणून मोदींचे छायाचित्र काढण्याची वेळ
पुण्यातील सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची होती. पंतप्रधान पदावरील व्यक्तीने अशी टीका करणे अत्यंत चुकीचे आहे. नागरिकांमध्ये भाजपाबद्दल चुकीचा संदेश जाऊन मतदार नाराज झाले. त्यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांना फलकांवरून नरेंद्र मोदी यांचे छायाचित्रे काढावी लागली, असे चव्हाण म्हणाले.
संघांशी संबंध नसल्याचे पत्रक कुलगुरूंनी काढावे
राहुल गांधी देशभरातील विद्यापीठांमध्ये कुलगुरू नियुक्तीबाबत केलेल्या विधानाचा १८० कुलगुरूंनी निषेध केला होता. या बाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, की संबंधित कुलगुरूंनी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध नाही याचे पत्रक काढावे.
विदर्भातील आमदार पुण्यात…
विदर्भातील निवडणूक पूर्ण झाल्याने विदर्भातील सहा आमदार पुण्यात प्रचाराचे काम करत आहेत. या आमदारांकडे मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.