बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री केल्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गंज पेठेत कारवाई केली. या कारवाईत दोघांकडून साडेदहा लाख रुपयांचा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ख्वाजा उर्फ साहिल अस्लम मुलाणी (वय २०), शादाब मुश्ताक नाईकवाडी (वय २४, दोघे रा. गंज पेठ) यांना अटक करण्यात आली. गंज पेठेतील नूर केटरर्सजवळ असलेल्या खोलीत गुटख्याची साठवणूक करण्यात आला होता. बेकायदा गुटख्याची साठवणूक करुन त्याची विक्री करण्यात येत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार संजय भापकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दहा लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नोंदणी व मुद्रांक भवनाचे आज भूमिपूजन

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे आदींनी ही कारवाई केली

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tobaco worth ten and a half lakhs seized action of anti extortion squad pune print news tmb 01