पुणे : सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाला या लढाईपासून सुरुवात झाली. त्यामुळे आज राजकीय काहीही बोलणार नाही, अशी टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी केली.
कोरेगाव भीमा ऐतिहासिक स्तंभाला आंबेडकर यांनी सपत्नीक अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आंबेडकर म्हणाले, की सामाजिक उन्नयन आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचा हा दिवस आहे. देशात हजारो वर्षे सामाजिक आणि राजकीय गुलामी होती. या दोन्ही गोष्टी कोरेगाव भीमाच्या लढाईत संपल्या. त्याचे प्रतिक असलेल्या या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक लोक येतात.
हेही वाचा >>> कोरेगाव-भीमा परिसरात कडेकोट बंदोबस्त; ७० जणांना उपस्थित राहण्यास मनाई
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी या अभिवादन कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर आंबेडकर म्हणाले, की अभिवादन करण्यासाठी कोणी यायचे, कोणी यायचे नाही, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर भाष्य करणार नाही. आज कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही.