अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा

ज्येष्ठ अभिनेते टॉम अल्टर यांनी ‘फिल्म इन्स्टिटय़ूट’मधील (एफटीआयआय) अभिनय विभागाच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. इतर कामातील व्यस्ततेमुळे आपण संस्थेला वेळ देऊ शकत नाही, असे कारण अल्टर यांनी संस्थेला ई-मेल केलेल्या राजीनाम्यात दिल्याची माहिती संस्थेतील सूत्रांनी दिली. परंतु विद्यार्थ्यांशी पटत नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.  अल्टर नोव्हेंबर २०१४ मध्ये अभिनय विभागप्रमुख म्हणून रुजू झाले होते. राजीनामा परत घेण्यासाठी प्रशासनाकडून अल्टर यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Story img Loader