मासे पकडण्याचा जवळपास दीड इंचाचा लोखंडी गळ घशात अडकल्याने जखमी झालेल्या एका दुर्मिळ कासवावर महापालिकेने यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ते बचावले आहे. दहा वर्षे वयाची मादी असलेल्या या जखमी कासवाची माहिती वाल्हेकरवाडीतील एका इसमाने पालिकेला दिली होती.
अतिरिक्त आयुक्त तानाजी िशदे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. वाल्हेकरवाडी येथील नदीपात्रात काही दिवसांपूर्वी एका नागरिकाला जखमी अवस्थेत हे कासव सापडले होते. दुर्मिळ प्रजातीचे हे कासव त्याने महापालिकेशी संपर्क साधून पशुवैद्यकीय विभागाकडे दिले. डॉ. सतीश गोरे यांनी कर्मचारी अनिल राऊत, काळूराम इंगवले, हरी रेड्डी, विशाल खोले यांच्या सहकार्याने त्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली आणि घशातील गळ काढण्यात आला. त्यानंतर ही जखम टाके टाकून बंद करण्यात आली. कासवास जीवदान मिळाले असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याला महापालिकेच्या आकुर्डी येथील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आले आहे.
गळ घशात अडकलेल्या दुर्मिळ कासवावर शस्त्रक्रिया
जखमी झालेल्या एका दुर्मिळ कासवावर यशस्वी शस्त्रक्रिया केल्याने ते बचावले आहे.
Written by 02shraddhawदया ठोंबरे
आणखी वाचा
First published on: 04-09-2015 at 02:24 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tortoise operation successful pimpri