लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांची सफर घडविण्यासाठी पीएमपीने पर्यटन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक मे पासून या सेवेला प्रारंभ होणार असून प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटन बससेवा सुरू राहणार आहे. पिंपरी दर्शन सेवाही सुरू करण्यात येणार आहे.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
The Origin of the Honeymoon Tradition
सफरनामा : मधु इथे अन्…
st employees loksatta
एसटी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेवर संघटना म्हणते…
Citizens in rural areas will get property certificate thane news
ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणार “मालमत्ता पत्रक “
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Bogie - Vogie Restaurant, Restaurant at Akurdi Railway Station, Pimpri , Akurdi ,
पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट
pune mahametro loksatta news
‘महामेट्रो’कडून हवाईप्रवाशांसाठी विशेष सुविधा, कसा होणार फायदा?

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा, जेजुरी, अष्टविनायकापैकी मोरगांव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील चिंतामणी, रांजणगाव येतील महागणपती, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील विविध धार्मिक स्थळे, तीर्थस्थळांचे दर्शन घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी भाविक आणि पर्यटक प्रवासी येत असतात. त्यामुळे ‘पुणे दर्शन’ बससेवेच्या धर्तीवर ही सेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. पीएमपीच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त धार्मिक आणि पर्यटन स्थळांसाठी वातानुकुलीत ई-बस द्वारे ही विशेष सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-मिळकतकरातील चाळीस टक्के सवलतीची रक्कम चार टप्प्यात वळती करण्याचा महापालिकेचा निर्णय

पर्यटन सेवा एकमध्ये हडपसर, मोरगांव, जेजुरी, सासवड, हडपसर या ठिकाणांचा समावेश आहे. सकाळी नऊ वाजता हडपसर येथील गाडीतळ थांब्यापासून सेवेला सुरुवात होईल. त्यासाठी प्रती प्रवासी एक हजार रुपये तिकिट निश्चित करण्यात आले आहे. हडपसर, सासवड येथील सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर, बालाजी मंदिर (केतकावळे), बनेश्वर, कोंढणपूर मंदिर, हडपसर ही दोन क्रमांकाची पर्यटन सेवा असून हडपसर येथून सकाळी नऊ वाजता सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यासाठीही प्रती प्रवासी एक हजार रुपये दर आहे. पर्यटन क्रमांक तीनच्या सेवा डेक्कन येथून सुरू होणार असून खारावडे येथील म्हसोबा देवस्थान, टेमघर धरण, निळकंठेश्वर पायथा या मार्गावर ही सेवा प्रस्तावित आहे. त्यासाठीही प्रती प्रवासी एक हजार रुपये तिकिट दर ठेवण्यात आला आहे.

आणखी वाचा- महाराष्ट्र दिनापासून जिल्ह्यात ‘कचरामुक्त अभियान’

पुणे रेल्वे स्थानक येथून खडकवासला धरण, पानशेत धरण, वरसगांव धरण परिसरासाठी सकाळी नऊ वाजता गाडी सोडण्यात येणार आहे. या सेवेला पर्यटन सेवा क्रमांक चार असे नाव देण्यात आले आहे. सकाळी नऊ वाजता पुणे रेल्वे स्थानक परिसरातून गाडी सुटणार असून प्रती प्रवासी एक हजार रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्थानक येथूनच पुलगेट, हडपसर, रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम ही सेवा प्रस्तावित आहे. त्यासाठी प्रती प्रवासी सातशे रुपये दर आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानक येथून वाघोली येथील वाघेश्वर मंदिर, वाडेबोल्हाई, छत्रपती संभाजी महाराज समाधी मंदिर (वढू बुद्रुक), रांजणगाव गणपती अशी सेवा आहे.

पिंपरी-चिंचवड दर्शन सेवाही पूर्ववत

पिंपरी-चिंचवड दर्शन सेवा पर्यटकांच्या प्रतिसादा अभावी स्थगित करण्यात आली होती. ती पूर्ववत करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजता भक्ती-शक्ती उद्यानापासून सेवेला प्रारंभ होईल. या सर्व सेवांसाठी आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे तिकिट काढल्यास पाच प्रवासांच्या तिकिट दरामध्ये शंभर टक्के सवलत देण्यात येणार आहे. प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी पर्यटक मार्गदर्शकाची (गाईड) नेमणूक करण्यात आली आहे.

Story img Loader