पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची रविवारी मोठी गर्दी झाली. पुणे, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक मोठ्या संख्येने वाहनातून लोणावळ्यात दाखल झाल्याने शहरभर कोंडी झाली. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह स्थानिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा, खंडाळा परिसरात पाऊस पडत आहे. उन्हाळी सुटी असल्याने पुणे, मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागातून पर्यटक शनिवारपासून लोणावळा परिसरात दाखल झाले. सहकुटुंब पर्यटनासाठी आलेले अनेकजण मोटारीतून लोणावळा, खंडाळा परिसरात आल्याने ठिकठिकाणी कोंडी झाल्याचे दिसून आले. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक संथतगतीने सुरू होती. कोल्हापूर, कोकणात जाणारे पर्यटक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने जात असल्याने कोंडीत भर पडली. शनिवार आणि रविवार मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तांत्रिक कामासाठी दोन तास बंद ठेवण्यात आल्याने कोंडीत भर पडली.

हेही वाचा…अवकाळी पावसाचा पालेभाज्यांना फटका

लायन्स ईंट, राजमाची उद्यान परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. पावसाळ्यात भुशी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होती. अन्य भागात फारशी गर्दी झाली नव्हती. जून महिन्यात शाळा सुरू होणार असल्याने अनेकजण सहकुटुंब पर्यटनासाठी लोणावळा परिसरात आले होते. अनेकांनी मुक्कामाचे बेत ठरविले होते. त्यामुळे शहरातील हॉटेलमधील खोल्या आरक्षित झाल्या होत्या. महाबळेश्वर, कोल्हापूर, सातारा, नाशिक भागात जाणारे पर्यटक लोणावळ्यात थांबल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लोणावळा महामार्ग पोलीस, बोरघाट पोलीस तसेच खंडाळा महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न करणयात आले. घाट क्षेत्रात वाहनांचा वेग संथ झाल्याने अनेक ठिकाणी इंजिन गरम होऊन वाहने बंद पडल्याने कोंडीत भर पडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourist surge causes traffic chaos in lonavala during summer vacations pune print news rbk 25 psg
Show comments