पुणे : गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांकडून घटनास्थळांवरुन संशयित आरोपींचे हाताचे ठसे घेतले जातात. मार्केट यार्ड परिसरातील एका सोसायटीत वर्षभरापूर्वी एका बंगल्यात घरफोडी करुन पसार झालेल्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले. ठशांवरुन चोरट्यांचा माग काढण्यात आला. चोरट्यांकडून १२ लाख ७७ हजा रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छोटू उर्फ सिदू भैय्यालाल राजपूत (वय ३०, रा. कानेमई, जि. कौशंबी, उत्तर प्रदेश, सध्या रा. शिंदे वस्ती, शिवनगरी, कोथरुड ), अनिलकुमार उर्फ बल्ली रामसिंह राजपूत (वय २७, सध्या रा. मंडई, मूळ रा. बलपूर्वा, जि. कौशंबी, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गेल्या वर्षी मार्केट यार्डातील संदेश सोसायटीतील एका बंगल्यातून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा १४ लाख ५८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी चोरट्यांच्या हाताचे ठसे आढळून आले होते.

हेही वाचा – जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा नवोदित कलाकारांना कानमंत्र; म्हणाल्या, ‘अभिनय करताना’…

पोलिसांच्या पथकाने हाताच्या ठशांची पडताळणी केली. एक ठसा सराइत चोरटा छोटू राजपूत याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. राजपूत याच्याविरुद्ध पुणे आणि मुंबईत घरफोडीचे ११ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. राजपूत उत्तर प्रदेशात असल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने राजपूतला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अनिलकुमार याच्या मदतीने मार्केट यार्डातील संदेश सोसायटीत घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांकडून सोन्याची लगड, चांदीचे दागिने असा १२ लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

हेही वाचा – माझ्या पक्षातील लोकांचा माझ्यावर विश्वास नसेल तर माझे त्यांच्याशी काही देण घेण नाही – भाजपचे माजी खासदार संजय काकडे

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक सुनील भापकर, अमित जाधव, हिरवाळे, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव यांनी ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traces of house burglars burglary case in market yard area revealed pune print news rbk 25 ssb