पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. चाकूचा धाक दाखवून एका व्यक्ताने पतीसमोरच महिलेवर बलात्कार केला आहे. या नंतर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चामड्याच्या बॅग विकणाऱ्या व्यापाऱ्याला अटक केली आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी रवींद्र शेळके यांनी बुधवारी ( २६ जुलै ) सांगितलं की, “अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याने बलात्कार पीडितेच्या पतीला ४० हजार रुपयांचं कर्ज दिलं होतं. पण, पीडित महिलेच्या पतीने ते पैसे माघारी दिले नाही. त्यामुळे आरोपी व्यापारी महिलेच्या पतीला वारंवार धमकी देत मारहाण करत असे. फेब्रुवारी महिन्यात महिलेला आणि तिच्या पतीला आरोपीने शासकीय गृहनिर्माण वसाहतीतील आपल्या घरी बोलावलं. तेव्हा चाकूचा धाक दाखवून महिलेवर दोनदा लैंगिक अत्याचार केले. नंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला.”
“काही जणांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेच्या पतीला पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी सांगितलं. यानंतर पोलिसांनी आरोपील व्यापाऱ्याला घरातून अटक करत गुन्हा दाखल केला. बलात्कार आणि विविध कलमांतर्गात व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती शेळके यांनी दिली.
“आरोपीच्या घरातून व्हिडीओ जप्त करण्यात आले आहेत. आरोपी हा एकटाच राहतो. तर, त्याची पत्नी आणि दोन्ही मुले अन्य ठिकाणी राहतात,” असं शेळके यांनी सांगितलं.
आरोपीला बुधवारी पुणे कॅन्टोन्टेंट न्यायालयात हजार करण्यात आले होते. तेव्हा न्यायालयाने गुरुवारपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.