पुणे : मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत आहे. बहुतांश फळभाज्यांचे दर आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरेच्या दरात घट झाली असून, मेथीचे दर तेजीत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून २ ते ३ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ६ ते ७ टेम्पो गाजर, गुजरातमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ५ ते ६ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nikki tamboli and samir choughule
Video: निक्की तांबोळी आणि समीर चौघुले यांनी सांगितली चमचमीत बटाटावड्याची रेसिपी; पाहा व्हिडीओ
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
state government fixed Dharavi redevelopment plots with Kurla Dairy priced ten times lower
धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला डेअरीचा भूखंड
Loksatta samorchya bakawarun February 1st upcoming budget
समोरच्या बाकावरून: दिल्लीतील कुजबुज असे सांगते की…
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
pune tomato prices fall
टोमॅटोचे भाव घसरले, शेतकरी हवालदिल

हेही वाचा…कोंढव्यात दुचाकी घसरुन महिलेचा मृत्यू; दुचाकीस्वार पती जखमी

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो दहा ते अकरा हजार पेटी, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ३ ते ४ टेम्पो, फ्लाॅवर ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, कांदा १०० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत काेथिंबिरेच्या दरात घट झाली आहे. मेथीच्या दरात वाढ झाली आहे. कांदापात, पुदिना, अंंबाडी, मुळे, राजगिरा, चुका, चवळईचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर सव्वा लाख जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. घाऊक बाजारात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडीमागे तीन ते चार रुपयांनी घट झाली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते १५००, मेथी – २००० ते २३००, शेपू – ८०० ते १५००, कांदापात- १००० ते १५००, चाकवत – ५०० ते ८००, करडई- ५०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ५०० ते ८००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ४००-७००, पालक- ८००-१५००.

हेही वाचा…वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी

डाळिंब स्वस्त

डाळिंबाच्या दरात घट झाली आहे. कलिंगड, खरबूज, पपईच्या दरात वाढ झाली आहे. सीताफळ, चिकू, अननस, सफरचंद, बोरे, संत्री, मोसंबी, लिंबांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ४० ते ५० टन, संत्री ७० ते ८० टन, डाळिंब ६० ते ६५ टन, पपई ३ ते ४ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड २ ते ३ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू २५० गोणी, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट), सफरचंद दाेन ते अडीच हजार पेटी, बाेरे २५० गोणी, सीताफळ ३० ते ३५ टन अशी आवक झाली.

Story img Loader