पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रमाणपत्र आणि पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांच्या आराखड्यात बदल केले आहेत. या बदलांची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांऐवजी महाविद्यालयांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पायाभूत अभ्यासक्रम (फाऊंडेशन), तर पदवीधरांसाठी प्रगत अभ्यासक्रम (ॲडव्हान्स्ड) अभ्यासक्रम सुरू करता येणार असून, पारंपरिक पदविका अभ्यासक्रम बंद होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांकडून कौशल्य विकासासाठी विविध प्रमाणपत्र, पदविका, प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने प्रचलित प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका आणि पदव्युत्तर पदविकाचे नामाभिधान (नोमेनक्लेचर), श्रेयांक, कालावधी आदींबाबत धोरण ठरविण्यासाठी डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीचा अहवालानुसार २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन रचना लागू करण्यास विद्यापीठाने मान्यता दिली. त्यामुळे आता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाऐवजी पायाभूत अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाऐवजी प्रगत अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. त्या बाबतचे परिपत्रक विद्यापीठाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले.

हेही वाचा… शाळा सुरु करण्याच्या आमिषाने एक कोटी १७ लाखांची फसवणूक; न्यायालयाच्या आदेशाने प्राचार्यांसह तिघांवर गुन्हा

विद्यापीठाचे विभाग, सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांनी सध्या अस्तित्वात असलेले सर्व प्रमाणपत्र, प्रगत प्रमाणपत्र, पदविका व पदव्युत्तर पदविकाचे नामाभिधान, श्रेयांक, कालावधी, अभ्यासक्रम या बाबतची माहिती ३० डिसेंबरपर्यंत अद्ययावत करावी लागणार आहे. त्यासाठीची सुविधा विद्यापीठाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत माहिती अद्ययावत न केल्यास पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा अभ्यासक्रमाला मान्यता मिळणार नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे नामाभिधान

अभ्यासक्रमकालावधीश्रेयांक
प्रमाणपत्रएक वर्ष२० ते २२
डिप्लोमादोन वर्षे८० ते ८८
पदवीतीन वर्षे१२० ते १३२
पदवी (ऑनर्स किंवा रीसर्च)चार वर्षे१६० ते १७६
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional degree courses closed from next year the decision of savitribai phule pune university pune print news ccp 14 dvr
Show comments