पुणे : नऊवारी आणि फेटे परिधान केलेल्या महिला आणि पारंपारिक पेहरावातील पुरुष कार्यकर्त्यांच्या अमाप उत्साहात निघालेल्या दुचाकी फेरीने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या पुण्यातील कार्यक्रमांची शुक्रवारी नांदी झाली. मराठी रंगभूमीवरील अजरामर शंभर व्यक्तिरेखेच्या वेशभूषेतील कलाकारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानिमित्त बालगंधर्व रंगमंदिरापासून सुरू झालेल्या दुचाकी फेरीची गणेश कला क्रीड़ा मंच येथे सांगता झाली. ढोल-ताशांच्या निनादात निघालेल्या या फेरीमध्ये तीनशे दुचाकी, दहा रथांवर विराजमान ज्येष्ठ कलाकार आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या शंभर व्यक्तिरेखांच्या पेहरावातील कलाकारांचा सहभाग होता.

हेही वाचा : पिंपरी : नाट्य संमेलनातील बालनगरीची धमाल, संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज विविध कार्यक्रम

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, विजय पटवर्धन, रजनी भट, जयमाला इनामदार, दीपक रेगे, माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, गिरीश ओक, शोभा कुलकर्णी, अभिजित बिचुकले यांच्यासह पुण्यातील कलावंत, नाटय परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश कला क्रीडा मंच येथे रंगमंच पूजन तसेच प्रशांत दामले यांच्या हस्ते तिसरी घंटा देऊन दिवसभराच्या कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traditional look bike rally in 100th akhil bhartiy marathi natya sammelan pune print news vvk 10 pbs