लोकसत्ता वार्ताहर

लोणावळा: शनिवार व रविवारच्या सुट्टयांना जोडून गुड फ्रायडेची सुट्टी आल्याने शुक्रवारी सकाळपासून मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई भागातून मोठ्या संख्येने पर्यटक खाजगी वाहनांमधून बाहेर पडल्याने खालापूर टोलनाका आणि खंडाळा घाट भागात वाहतूक कोंडी झाली होती.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
uran karanja road potholes
उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Ignorance of Municipal Corporation and Traffic Police Department towards not working traffic signal
नागपूर : बंद वाहतूक सिग्नल; वाहनचालकांना मन:स्ताप, महापालिका-वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?

ही कोंडी सोडविण्यासाठी साडेअकरा वाजल्यापासून महामार्ग पोलिसांनी आडोशी बोगदा ते खंडाळा बोगदा परिसरात पुणे मुंबई मार्गिकेवर वाहतूक ब्लॉक घेत मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी वाहने सोडण्यात आल्याने दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली होती. दुपारपर्यंत ही कोंडी कायम होती. खंडाळा आणि बोरघाट महामार्ग पोलीस ही कोंडी सोडविण्यासाठी दिवसभर प्रयत्न करत होते. मात्र, वाहनांची संख्या जास्त असल्याने घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला होता.