पुणे : महापालिकेकडून येरवडा येथील गोल्फ क्लब चौकातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या नऊ टप्प्यांपैकी आठ टप्प्यांचे आरसीसीचे काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामासाठी मुख्य चौकातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आंबेडकर चौक ते शास्त्रीनगर चौक हा रस्ता फक्त हलक्या वाहनांसाठी (२.५ मीटर उंची) सुरू राहणार आहे. आंबेडकर चौकातून गुंजन चौकाकडे उजवे वळण तसेच शास्त्रीनगर चौकातून विमानतळ रस्त्यावरील उजवे वळण सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. गुंजन चौक ते विमानतळाकडे जाणारा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सुरू राहील. गुंजन चौकातून शास्त्रीनगर चौकाकडे जाणारे उजवे वळण तसेच विमानतळाकडून आंबेडकर चौकाकडे जाणारे उजवे वळण सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॅा. कुणाल खेमनार यांनी दिली.