लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : लष्कर भागातील कृष्ण कन्हैय्या सोसायटी ते खाणे मारुती चौक दरम्यान मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, या भागातील वाहतूक व्यवस्थेत २ एप्रिलपर्यंत वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरातून जाणाऱ्या वाहनांना ट्रायलक हॉटेलजवळून उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी खाणे मारुती चौकातून डावीकडे वळून पुलगेटकडे जावे. तेथून उजवीकडे वळून गोळीबार मैदान चौकातून उजवीकडे वळावे. वाय जंक्शन परिसरातून ट्राय लक हॉटेल चौकातून इच्छितस्थळी जावे. गोळीबार मैदान चौकातून खाणे मारुती चौकाकडे (डावीकडील वळण) जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या भागातून जाणाऱ्या वाहनचालकांनी खाणे मारुती चौकातून सरळ इस्ट स्ट्रीटकडे जावे. व्होल्गा चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे किंवा इंदिरा गांधी चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

गोळीबार मैदान चौक, वाय जंक्शन चौक ते ट्राय लक हॉटेल दरम्यान दोन्ही बाजुंना वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. ट्रायलक चौकातून खाणे मारुती चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद आहे. संबंधित आदेश तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आला आहे. गोळीबार मैदान. वाय जंक्शन चौकातून खाणे मारुती चौकाकडे जाण्यास बस आणि ट्रकला परवानगी देण्यात आली आहे. बस आणि ट्रकचालकांनी सरळ इस्ट स्ट्रीट किंवा सोलापूर रस्त्याने इच्छितस्थळी जावे. गोळीबार मैदान, वाय जंक्शन चौकातून महात्मा गांधी रस्त्याकडे मोटार, रिक्षाचालक, तसेच दुचाकीस्वारांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही वाहने ट्रायलक चौकातून उजवीकडे वळून खणे मारुती चौकातून इस्ट स्ट्रीट किवा सोलापूर रस्तामार्गे इच्छितस्तळी जातील.