लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त सोमवारी (२६ ऑगस्ट) लष्कर भागतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. न्यू मोदीखाना परिसरातून मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ सोमवारी दुपारी होणार असून, लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

There is no truth in Raj Thackerays allegation says jayant patil
राज ठाकरे यांच्या ‘त्या’ आरोपात तथ्य नाही : जयंत पाटील
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
pune flowers price
पुणे: गोकुळाष्टमीनिमित्त मागणी वाढल्याने फुलांच्या दरात वाढ
pune traffic changes dahihandi
पुणे: दहीहंडीनिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल
pune vegetable prices marathi news
या आठवड्यात मटार उसळ करण्याचा प्लॅन असेल, तर ही बातमी आधी वाचा…
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
case against 300 workers of azad samaj party
आदेश धुडकावून मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा
pune police inspector koyta attack marathi news
भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सराइतांकडून कोयत्याने वार, हडपसर भागातील घटना

न्यू मोदीखाना भागातून सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. न्यू मोदीखाना, पूलगेट पोलीस चौकी, मेढीमाता मंदिर, महात्मा गांधी रस्ता, कुरेशी मशिद, सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, महावीर चौक मार्गे मिरवणूक महात्मा गांधी रस्त्याने जाणार आहे. मिरवणुकीचा सांगता मेढी माता मंदिर येथे होणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

आणखी वाचा-शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे झाले ‘सक्रिय’? हे आहे कारण…!

गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक वाय जंक्शन येथून वळविण्यात येणार आहे. खाणे मारुती चौकातून वाहने इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक खाणे मारुती चौकातून वळविण्यात येणार आहे. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.