लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : वीर गोगादेव उत्सवानिमित्त सोमवारी (२६ ऑगस्ट) लष्कर भागतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. न्यू मोदीखाना परिसरातून मुख्य मिरवणुकीचा प्रारंभ सोमवारी दुपारी होणार असून, लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
न्यू मोदीखाना भागातून सोमवारी दुपारी चारच्या सुमारास मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. न्यू मोदीखाना, पूलगेट पोलीस चौकी, मेढीमाता मंदिर, महात्मा गांधी रस्ता, कुरेशी मशिद, सेंटर स्ट्रीट, भोपळे चौक, महावीर चौक मार्गे मिरवणूक महात्मा गांधी रस्त्याने जाणार आहे. मिरवणुकीचा सांगता मेढी माता मंदिर येथे होणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
आणखी वाचा-शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे झाले ‘सक्रिय’? हे आहे कारण…!
गोळीबार मैदान चौकातून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक वाय जंक्शन येथून वळविण्यात येणार आहे. खाणे मारुती चौकातून वाहने इच्छितस्थळी जातील. सोलापूर रस्त्याकडे जाणारी वाहतूक खाणे मारुती चौकातून वळविण्यात येणार आहे. मुफ्ती फौज चौकातून कुरेशी मशिदकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक वळविण्यात येणार आहे.
© The Indian Express (P) Ltd