पाषण-सूस पूल परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रायोगिक तत्वावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. पाषाणकडून सूसकडे जाणाऱ्या पुलाच्या अलीकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर आता जीपीएस प्रणालीद्वारे लक्ष ; परीक्षा केंद्रांवर भरारी पथके आणि बैठी पथके, राज्य मंडळाचा निर्णय 

या भागातील पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे- बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांसाठी सूस पूल ओलांडताना २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छितस्थळी जावे. पाषाण मार्गे साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाडी, पाषाणमार्गे इच्छित स्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पुल ओलांडून २०० मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा रस्त्याने मुंबईकडे तसेच सूसकडे जावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे. वाहतूक बदलांविषयी काही हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी वाहतूक विभाग, पोलीस उपायुक्त, जेल रस्ता, येरवडा, पुणे-४११००६ येथे लेखी स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes in pashan sus bridge area on experimental basis pune print news rbk 25 zws