पिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा शुक्रवारपासून ( २८ जून) सुरू होत आहे. शुक्रवारी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शनिवारी ( २९ जून) आळंदीतून आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह देहू-आळंदी मार्गावर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल २५ ते ३० जूनपर्यंत असणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी देहू, आळंदी येथे वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तुकोबारायांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहूतील इनामदार वाडा येथे असून, शनिवारी ( २९ जून ) हा सोहळा आकुर्डीतील विठ्ठल मंदिर येथे मुक्कामासाठी येणार आहे. तसेच माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीतीलच गांधी वाडा येथे असेल. त्यानंतर या दोन्ही पालख्या शनिवारी ( ३० जून) पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.

Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Pune Metro, Swargate,
पुणे मेट्रो सुसाट…! स्वारगेटपर्यंत धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Pune hotel menu card viral on social media punekar swag puneri pati viral
पुणे तिथे काय उणे! हॉटेलच्या मेन्यू कार्डवर महिलांसाठी सूचना; वाचून म्हणाल “पुणेकरांना एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून?”
gangster with 90 police cases
९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला घरात शिरून केलं अटक; निगडी पोलिसांची दबंग कामगिरी
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Puneri Pati Puneri Poster Goes Viral On Social Media
Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच

हेही वाचा >>>पुण्यात झिकाचा शिरकाव, एरंडवण्यात दोन रुग्ण आढळले; महापालिकेच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू

आळंदीतील वाहतूक बदल

चिंबळी ते आळंदी रस्ता बंद राहणार असून, चिंबळी फाटा चौक, चाकण येथून आळंदीकडे येणारी वाहने जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे तसेच भोसरी चौक-मॅगझीन चौक मार्गे जातील. चाकण ते आळंदी या मार्गावरील वाहने जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक-मॅगझीन चौक मार्गे जातील. वडगाव घेणंद ते आळंदी या मार्गावरील वाहने चाकण-वडगांव घेणंद शेळपिंपळगाव मार्गे कोयाळी कमान, कोयाळी-मरकळगाव मार्गे जातील. मरकळ ते आळंदी या मार्गावरील वाहने मरकळकडून धानोरे फाटा मार्गे चऱ्होली फाटा – मॅगझीन चौक, अलंकापुरम चौक मार्गे जातील. भारतमाता चौक ते आळंदी या मार्गावरील वाहने जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक- मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील. मोशी-आळंदी या मार्गावरील वाहने जय गणेश साम्राज्य चौक, अलंकापुरम चौक मार्गे, भोसरी चौक-मॅगझीन चौक, मोशी-चाकण-शिक्रापूर मार्गे जातील. विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावरील वाहने पुणे-दिघी मॅगझीन चौकाकडून आळंदीकडे येणारी वाहने भोसरी-मोशी-चाकणमार्गे शेलपिंपळगाव मार्गे जातील. अलंकापुरम-जय गणेश साम्राज्य चौक मार्गे जातील. आळंदीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना चऱ्होली फाटा चौकाचे पुढे, डुडुळगाव जकात नाक्याचे पुढे, केळगाव चौक, बापदेव चौकाच्या पुढे, इंद्रायणी रुग्णालयाच्या पुढे, विश्रांतवाडीच्या, धानोरी फाटा / पीसीएस चौकाचे पुढे जाण्यास प्रवेश बंदी असेल. हा बदल मंगळवारी २५ ते ३० जून रात्री नऊ वाजेपर्यंत अथवा वाहतूक सुरळीत होईपर्यंत लागू राहणार आहे.

हेही वाचा >>>युजीसीकडून पदव्युत्तर पदवीसाठीचा नवा आराखडा जाहीर… कोणते बदल होणार ?

देहूतील वाहतुकीत बदल

मुंबई-पुणे महामार्गावरील देहू कमान ते देहूगाव या मार्गावरील वाहतूक बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने भक्ती-शक्ती चौक ते त्रिवेणीनगर ते तळवडे गावठाण ते कॅनबे चौक ते खंडेलवाल चौक देहूगाव या मार्गे जातील. चाकण ते कॅनबे चौक तसेच तळवडे गावठाण चौक ते कॅनबे चौक ते महिंद्रा सर्कल हा मार्ग बंद राहणार आहे. या मार्गावरील वाहने मोशीतील भारतमाता चौक, नाशिक हायवे मार्गे इच्छितस्थळी जातील. तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा ते देहूगाव हा मार्ग बंद राहणार असून, या मार्गावरील वाहने एचपी चौकमार्गे जातील. देहू कमान ते चौदा टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. खंडेलवाल चौक ते देहू कमान मुख्य ते परंडवाल चौक, खंडेलवाल चौक ते देहू मुख्य कमान ते परंडवाल चौक या मार्गावर जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. मुंबई-पुणे महामार्गावरील सेंट्रल चौक देहूरोड ते भक्ती शक्ती मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असून, या मार्गावरील सर्व प्रकारची वाहने सेंट्रल चौक-मामुर्डी- किवळे-भूमकर चौक – डांगे चौक मार्गे जातील.

आळंदीत वाहनतळांची व्यवस्था

आळंदी- देहू रस्त्यावरील तळेकर पाटील चौक (दक्षिणेस) तीन एकर, उत्तरेस एक एकर, ज्ञानविलास महाविद्यालय डुडुळगाव जकात नाक्याजवळ दहा गुंठे, बोपदेव चौक ४.५ एकर, इंद्रायणी रुग्णालयासमोर (चाकण रोड) नऊ एकर, विश्रांतवाडी वडगाव रस्ता २५ एकर आणि मुक्ताई मंगल कार्यालयासमोर एक एकर जागेत वाहतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

देहूगावातील वाहनतळ

देहूगाव येथील गायरान मैदान, सीओडी मैदान (राधा कृष्ण मंगल कार्यालयाजवळ) आणि खंडेलवाल चौक येथील माऊली वजनकाटा शेजारील मैदानात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.