पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जणारी मार्गिका वाहतुकीस १० फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित दोन मार्गिकेवरुन वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित

हेही वाचा – पुणे: मराठा आरक्षणावर धनंजय मुंडे यांच भाष्य म्हणाले, अर्ध यश..!

बाह्यवळण मार्गावरील जांभुळवाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम (एक्सपान्शन जाॅईंट) सुरू करण्यात आले आहे. जांभुळवाडी पूल परिसरातील मुंबईकडे जाणारी एक मार्गिका वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार असून, उर्वरित दोन मार्गिकेवरून वाहतूक सुरळीत ठेवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारीपर्यंत या भागात वाहतूक बदल करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी कळविले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic changes on mumbai bangalore bypass one route to mumbai closed pune print news rbk 25 ssb
Show comments