लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पिंपरी : शहरात ३३ पेक्षा अधिक पूल, उड्डाणपूल आणि समतल विलगक, भुयारी मार्गही असताना वाहतूककोंडी मात्र कायम आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दररोज कोंडी होत असल्याने हे प्रशस्त रस्ते आणि पूल अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर वसले आहे. शहराच्या चोहोबाजूंस ये-जा करण्यासाठी, तसेच सुरळीत रहदारीसाठी महापालिकेने प्रशस्त रस्त्यांसोबत पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांवर अनेक पूल बांधले आहेत. तसेच रेल्वे मार्ग, चौक आणि महामार्गावर उड्डाणपूल उभारले आहेत. त्यात नाशिक फाटा येथील भारतरत्न जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकातील दुमजली उड्डाणपूल, भोसरी, चिंचवडगाव, थेरगावातील डांगे चौक येथील उड्डाणपूल हे मोठे आहेत. त्या पुलांमुळे सुरुवातीला वाहतूक सुरळीत होती; मात्र, शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे ते वाहतुकीस अपुरे पडत असल्याचे दिसून येत आहे. पूल असूनही अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
शहरातील पूल, उड्डाणपूल
पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपूल, पिंपरीगाव-पिंपळे सौदागर (दोन पूल), दापोडी हॅरिस ब्रिज (दोन पूल), दापोडी-फुगेवाडी, दापोडी-बोपोडी, दापोडी-सांगवी, बोपखेल-खडकी, सांगवी-स्पायसर महाविद्यालय, सांगवी-पुणे विद्यापीठ, नाशिक फाटा, निगडीतील शक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, निगडीतील टिळक चौक, भोसरी, स्पाईन रस्ता, चिंचवड गावातील मोरया मंदिराशेजारी, चिंचवडगाव ते बिर्ला रुग्णालय, चिंचवड स्टेशन (दोन पूल), चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपूल, बिजलीनगर, थेरगावातील डांगे चौक, वाकड-हिंजवडी, निगडी-रावेत, सांगवी फाटा-औंध, तळवडे-निघोजे, कासारवाडी-पिंपळे गुरव, दापोडी-पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर-जगताप डेअरी, काळेवाडी फाटा, पुनावळे-रावेत बटरफ्लाय पूल, कुदळवाडी उड्डाणपूल असे ३३ पूल, उड्डाणपूल शहरात आहेत. तर, पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्म, चिंचवडगावातील बटरफ्लाय, पिंपळे निलख-बाणेर येथील पुलाचे काम सुरू आहे.
शहरात एक लाख ८१ हजार वाहने
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार, सन २०२३-२४ मध्ये शहरात एक लाख ८१ हजार दोन वाहनांची नोंद आहे. त्यामध्ये सर्वाधिक एक लाख आठ हजार १५४ दुचाकी आहेत.
आणखी वाचा-पुणे : कॉलसेंटरमधील तरुणीवर सहकाऱ्याकडून कोयत्याने हल्ला, येरवडा भागातील घटना; हल्लेखोर ताब्यात
एक हजार ३०० किलोमीटरचे रस्ते
शहरात १२ फुटांपासून ८० फूट रुंदीचे असे एक हजार ३०० किलोमीटर अंतराचे मुख्य व अंतर्गत रस्ते आहेत. डांबरी, काँक्रिटचे रस्ते आहेत. आता काँक्रिट रस्त्यांची संख्या वाढत आहे. पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचे रस्ते खड्डेमुक्त व प्रशस्त असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे.
वाहतूक नियंत्रक दिवा (सिग्नल) लागल्यानंतर काही मिनिटांसाठी पुलावर वाहने थांबतात. पावसाळ्यात वाहतूक संथ होत असल्याने पुलावर वाहने थांबलेली दिसतात. रस्ते व पदपथावरील बेशिस्त वाहनांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर टाळून पीएमपी, मेट्रो, लोकल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, तसेच सायकलचा वापर करावा. त्यामुळे वायू व ध्वनिप्रदूषणही कमी होईल, असे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे म्हणाले.