जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटने टोल नाका हटाव या मागणीसाठी कृती समितीचे शेकडो सदस्य, मावळवातील रहिवासी हे महामार्गावर उतरले आहेत. महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक सध्या पूर्णतः बंद करण्यात आली असून काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सोमाटने टोल नाका हटाव या मागणीसाठी कृती समिती लढा देत आहे. शनिवारपासून त्यांनी तळेगाव येथील विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज महामार्गावर कृती समितीचे सदस्य, नागरिक गोळा झाले असून महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ही सध्या थांबवण्यात आली आहे. सोमाटने टोल नाका हा बेकायदेशीर आहे असा आरोप कृती समितीचे किशोर आवारे यांनी केला आहे. त्यांनी शनिवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन हजार कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हा टोल नाका आहे. सोमाटने आणि वरसोली असे दोन टोल नाके ३१ किलोमीटर अंतराच्या आत आहेत. प्रत्यक्षात ६० किलोमीटरच्या आत एकच टोल नाका असावा असा राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम २०१८ चा नियम आहे. म्हणूनच या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. २००६ ला हा टोल नाका सुरू झाला असून २०१९ मध्ये त्याची मुदत संपलेली आहे असा दावा आंदोलन कर्त्यांकडून करण्यात येतोय. शिवाय ८०० कोटी वसून करण्याची मुभा असताना प्रत्येक्षात अडीच हजार कोटी वसूल केल्याचा दावाही आंदोलनकर्त्यांनी केला आहे. म्हणूनच सोमाटने टोल हटाव कृती समितीने बेकायदेशीर सुरू असलेली टोल वसुली बंद करावी अशी मागणी करत अनेकदा आंदोलने केली आहेत. त्यामुळंच काही महिन्यांपूर्वी या टोल नाक्यावरून स्थानिकांना विनाटोल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.

हेही वाचा… पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास तीन महिने कारावास

मात्र कालांतराने टोल आकारणाऱ्यांनी पुन्हा टोल वसुली सुरू केली. त्यामुळेच पुन्हा एकदा सोमाटने टोल हटाव कृती समिती आक्रमक झालीय. शनिवारपासून बेमुदत उपोषण सुरू केलं असून आछा तर आज थेट रस्त्यावर उतरत आंदोलन सुरु झालं आहे. याच आंदोलनाच्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण पोहचणार आहेत. ते टोल नाका बंद करण्याच्या अनुषंगाने नेमकं काय भाष्य करतात का हे पाहणं म्हत्वाचं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic disturbed on old mumbai pune highway due to agitation against somatane toll point kjp 91 asj