आमदार मुक्ता टिळक यांच्या अंत्ययात्रेसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन मध्य भागातील केळकर रस्ता, शास्त्री रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी (२३ डिसेंबर) बदल करण्यात येणार आहे.
केळकर रस्त्यावरील केसरी वाडा येथून सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असून अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर केळकर रस्ता, शास्त्री रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी टिळक रस्ता, लक्ष्मी रस्त्याचा वापर करून इच्छितस्थळी पोहोचावे, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत सांगळे यांनी कळविले आहे.