अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील उड्डाणपूल अखेर शनिवारी मध्यरात्रीनंतर एक वाजता वाजता मर्यादित स्फोट घडवून जमीनदोस्त करण्यात आला. पूल पाडण्यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पोलीस आणि तांत्रिक पथकाकाडून मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून तयारी करण्यात येत होती. पाडलेल्या पुलाचा राडारोडा हटिवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. राडारोडा उचलण्याचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पुण्यातील चांदणी चौकातील पूल २ तारखेला मध्यरात्री १ वाजता पाडल्यानंतर सकाळी ८ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होईल. असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे १० वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला होईल असे म्हटलं आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात अद्याप ही रस्ता खुला होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. यामुळे दोन्ही बाजूने तब्बल १० किलोमीटरच्या जड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.