पुणे : शनिवार चौकाकडून मंडईच्या दिशेने जाणारा रस्ता बंद केल्याने बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्ता आणि इतर रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलीस कमी पडल्याने आठवड्यातील पहिल्या सुटीचा शनिवार वाहतूक कोंडीत गेला. त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

शनिवार, रविवार असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठा नेहमीच गजबजलेल्या असतात. तुळशीबाग, मंडई, आणि गृहपयोगी वस्तुंच्या खरेदीसाठी सुट्टीच्या दिवसांमध्ये गर्दी होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच शनिवारी चंपाषष्टी असल्याने मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्यांची भर पडल्याने वाहतूक पोलिसांनी शनिपार चौकातून मंडईकडील दिशेने जाणारी वाहतूक बंद करून बाजीराव रस्त्यावरून वळविण्यात आली होती. याबाबत नागरिकांना कल्पना नसल्याने शनिपार चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक, कुमठेकर रस्त्यांवर वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या.

हेही वाचा >>>रामटेकडीत भंगार मालाच्या गोदामाला आग; रहिवासी भागात आग लागल्याने घबराट

वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल) सुरु असताना वाहतूक कोंडी झाल्याने बस, रिक्षा, दुचाकीचालकांना या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. त्यातच बेशिस्त वाहनचालक, रस्त्याच्या दूतर्फा उभी करण्यात आलेली वाहने, दुकानांमध्ये वस्तूचा पुरवठा करणारी वाहने थांबविण्यात आल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे.

शनिवार आणि रविवार सुटीचे वार असल्याने खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे शनिपार चौकातून मंडईकडे जाणारी वाहतूक बाजीराव रस्त्याकडे वळविण्यात आली आहे.- हर्षवर्धन गाडे, पोलीस निरीक्षक, विश्राम बाग वाहतूक शाखा

Story img Loader