पुणे : गणेशोत्सव खरेदीसाठी मध्यभागात शनिवारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. खरेदीसाठी शहर, तसेच उपनगरातील नागरिकांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने मध्यभागातील रस्त्यावर वाहने आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी भर पडली.

गणेशोत्सव आठवड्यावर येऊन ठेपला असून मंडई, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी, तुळशीबाग परिसरात शनिवारी सकाळपासून गर्दी झाली होती. शनिवारी आणि रविवारी सुट्या असल्याने नागरिकांनी सहकुटुंब खरेदीसाठी गर्दी केली होती. मंडई, तुळशीबाग, शनिपार, रविवार पेठेतील बोहरी आळी परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी कोंडीतून वाट काढत खरेदी केली. बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता परिसरातील वाहतुकीचा वेग संथ झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Diwali Viral Video
‘करोडे रूपये दिले तरी ते दिवस परत येणार नाही’ चिमुकल्यांचा किल्ला बनवतानाचा VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Loksatta Ganeshotsav Quiz
लोकसत्ता गणेशोत्सव क्विझच्या विजेत्यांचा सन्मान
Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
Viral Video Of Village
‘अजून एक लाडू बावासाठी… ‘ तुम्ही कधी पंगतीत जेवायला बसला आहात का? मग पाहा गावकडचा ‘हा’ VIRAL VIDEO
Thane Diwali Traffic congestion,
ठाणे : दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी, खरेदीमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी
Encroachment by food vendors is a serious problem on Mate Chowk to IT Park road
खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या अतिक्रमणाला आशीर्वाद कोणाचे? माटे चौक ते आयटी पार्क रस्त्याची समस्या गंभीर

हे ही वाचा… पुणे : समाज माध्यमातून झालेल्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

सुट्टी असल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद घेतला. अनेकजण मोटारीतून मध्यभागात खरेदीसाठी आले होते. मध्यभागातील मंडई, नारायण पेठ परिसरात वाहनतळावर मोटारी लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने या भागात मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. मध्यभागाासह उपनगरातील बाजारपेठेत शनिवारी खरेदीसाठी गर्दी झाली होती. कोथरुड, कर्वेनगर, वारजे, हडपसर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी या भागातील बाजारपेठेत गर्दी झाली होती. खरेदीसाठी आठवडाभर राहिल्याने अनेकांनी सहकुटुंब खरेदीचा आनंद लुटला.

उपनगरातील नागरिक गणेशोत्सवात आवर्जुन मध्यभागातील मंडई परिसरात खरेदीसाठी येतात. मध्यभागातील गल्ली बोळात बेशिस्तपणे वाहने लावल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

हे ही वाचा… पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अगरवाल याच्यावर गुन्हा,खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

मध्यभागात वाहतूक नियोजनासाठी बंदोबस्त

मंडई ते शनिपार परिसरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमामावर गर्दी करतात. गर्दीचे नियोजन करण्यासाठी या भागात वाहतूक पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्यावर मोटारी लावाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. —