पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कासावगतीने सुरू आहे. वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. संध्याकाळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर शनिवार आणि रविवार असेच चित्र बघायला मिळतं. आज विकेंड असल्याने लोणावळा परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता.

हेही वाचा – नॅक मूल्यांकनात पहिल्यांदाच राज्याची देशात आघाडी, सर्वाधिक १ हजार ९५७ उच्च शिक्षण संस्थांचे नॅक मूल्यांकन

हेही वाचा – पुणे : कुरिअर कंपनीच्या गाडीतून महागड्या मोबाइलची चोरी, चोरट्यांना अटक

सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात व्यस्त महामार्ग म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाची ओळख आहे. याच महामार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीमुक्त मोकळा श्वास कधी घेता येणार हा मोठा प्रश्न आहे. आजदेखील मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्थाप सहन करावा लागतो आहे. रविवार असल्याने लोणावळ्यात अनेक पर्यटक दाखल झाले होते. मंकी पॉईंट, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी झाली.

Story img Loader