पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अनेक चाकरमानी हे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपापल्या गावी निघाले आहेत. पण, त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक कासवगतीने सुरू आहे. उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्याने अनेक चाकरमानी हे त्यांच्या मूळ गावी निघण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांनी मुंबई- कोकण महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने पुणे- मुंबई महामार्गावरून कोकणात जाणे पसंत केले आहे.

आणखी वाचा-रस्त्यांवर वाहन फिरवून महापालिकेची तिजोरी ‘साफ’; वाचा नेमका काय आहे प्रकार!

परिणामी वाहनांची संख्या वाढल्याने द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक कोंडी झाली आहे. २० मिनिटांचा अवधी घेऊन मुंबहून पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक दोन्ही लेनवरून सोडली जात आहे. तर, पुण्याहून मुंबई च्या दिशेने जाणारी वाहतूक थांबवली जात आहे. पुणे- मुंबई वरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या प्रयत्न महामार्ग पोलिसांकडून केला जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam on pune mumbai highway and slows down near amrutanjan bridge kjp 91 mrj