पुणे : पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडी झाली. प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहरात सोमवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला. मंगळवारी (१३ सप्टेंबर) सकाळी पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणा बंद पडली. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. सकाळापासून पाऊस सुरू असल्याने अनेकजण मोटारीतून कामाला निघाले. मात्र, कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाल्याने कर्वे रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, बंडगार्डन रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा <<< Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा <<< सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांमुळेच शहर पाण्यात

अंगारकी चतुर्थी असल्याने शिवाजी रस्त्यावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची सकाळपासून गर्दी झाली होती. त्यामुळे शिवाजी रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाले. सकाळी सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात (नीलायम चित्रपटगृहाजवळ) मोठी कोंडी झाली होती. सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीची नियोजन करणाऱ्या पोलिसांची तारांबळ उडाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jams across city due to rain signal system main intersection closed pune print news ysh