अलिकडच्या काळात बेशिस्त वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसतंय. अपघातांमुळे होणारे नुकसान भविष्यात टाळायला हवं त्या दिशेने पुणे महानगर पालिका आणि सेफ किड्स फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या ट्रॅफिक पार्क मध्ये लहान मुलांसाठी एक छोटे विश्व तयार करण्यात आलंय. छोटे रस्ते, छोटे चौक, छोटे पथ दिवे, छोटे सिग्नल आणि बरंच काही. या ठिकाणी लहान मुलांना कळेल आणि वाचायला मज्जा येईल अश्या साध्या आणि सोप्या भाषेत ट्रॅफिकचे नियम सांगणार फलक लावले आहेत.
इथे सगळ्या प्रकारचे साईन बोर्ड्स त्यांच्या अर्थासहित लावलेले आपण बघू शकतो. हे ट्रॅफिक पार्क बघून मुलांच्या वाहतूक शिक्षणासाठी हा परिपूर्ण आणि उत्तम स्रोत आहे असं म्हणायला हरकत नाही.