पुणे: मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ स्वामी नारायण मंदिर परिसरात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्याचे आदेश वाहतूक पोलीस आयुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत.
बाह्यवळण मार्गावर गंभीर स्वरुपाचे अपघातांचे सत्र कायम आहे. अपघातांमुळे स्वामी नारायण मंदिर परिसर, तसेच दरी पुलाकडे जाणााऱ्या सेवा रस्त्यावर ४०० मीटरपर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. सेवा रस्त्यावर वाहने लावण्यात आल्यामुळे वाहतूक विस्कळीत होते.
हेही वाचा… पुणे: गोदाम मालकाचा खून करून अपघाताचा बनाव, गोदामाच्या भाड्यावरुन खून केल्याचे उघड
वाहतुकीचा वेग संथ होत असल्याने वाहतूक पोलिसांनी स्वामी नारायण मंदिर ते दरी पूलाकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर ४०० मीटरपर्यंत दुतर्फा वाहने लावण्यास मनाई केली आहे. याबाबत काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक शाखेच्या कार्यालयात (गोल्फ क्लब रस्ता, येरवडा) येथे लिखित स्वरुपात पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.