पुणे : दहीहंडीनिमित्त मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळनंतर छत्रपती शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

दहीहंडीनिमित्त छत्रपती शिवाजी रस्ता, महात्मा फुले मंडई, हुतात्मा बाबू गेणू चौक, अप्पा बळवंत चौक, टिळक रस्त्यावरील साहित्य परिषद चौक, नवी पेठेत मोठी गर्दी होते. मंगळवारी सायंकाळी पाचनंतर दहीहंडी फुटेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यानंतर छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Follow up of demands to candidates through manifesto from Rickshaw Panchayat before elections
रिक्षाचालकांच्या मागण्या ऐरणीवर! निवडणुकीच्या तोंडावर रिक्षा पंचायतीकडून जाहीरनाम्याद्वारे उमेदवारांकडे पाठपुरावा
Uran, air pollution Uran,temperature, humidity Uran,
हवा प्रदूषणाचा मुद्दा निवडणुकीतून गायब? उरणमधील वाढते हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा नागरिकांच्या शरीरावर परिणाम
rickshaw owners drivers Acche Din assembly election campaign
प्रचार मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन, तीन ते चार तासांसाठी रिक्षा चालकांना मिळतात ५०० ते १ हजार रुपये
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
thane traffic police
ठाणे: वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

हेही वाचा : पुणे: डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर दहीहंडीत बंदी ? सहपोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस ‘लेझर बीम’वर बंदीचे आदेश

छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. स. गाे. बर्वे चौकातू महापालिका भवनकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौकमार्गे महापालिका भवनकडे जावे. बुधवार चौकातून अप्पा बळवंत चौकाकडे जाणारी वाहतूक एकेरी करण्यात येमार आहे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. अप्पा बळवंत चौकातून बाजीराव रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

हेही वाचा : पुणे: डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर दहीहंडीत बंदी ? सहपोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस ‘लेझर बीम’वर बंदीचे आदेश

दहीहंडीनिमित्त बंद राहणारे रस्ते

  • मंडईतील रामेश्वर चौक ते शनिपार चौक
  • लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौक ते सेवा सदन चौक
  • छत्रपती शिवाजी रस्त्यावरील लालमहाल चौक ते गोटीराम भैय्या चौक, मंडई
  • दारुवाला पूल चौक ते गणेश रस्ता लाल महाल चौक