पुणे : स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आणि बुधवारी (२० नोव्हेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहे. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच परिसरातील मतदान केंद्रातून मतपेट्या, तसेच अन्य साहित्य पीएमपी बसने वितरित करण्यात येणार असल्याने या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीएमपी बसमधून मतपेट्या आणि मतदान साहित्याची वाहतूक करण्यात येणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसर ते नेहरु स्टेडीयम परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी आणि बुधवारी बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी सहा ते दुपारी एकपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चैाकातून सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी डाव्या मार्गिकेने जावे. उजव्या मार्गिकेवर मतदान साहित्याची वाहतूक करणाऱ्या पीएमपी बससाठी जागा उपलब्ध करून देणात येणार आहे.

हेही वाचा…आरक्षण संपविण्यासाठी ‘या ’ धोरणाचा वापर, मायावतींनी कोणावर केला गंभीर आरोप !

बुधवारी (२० नोव्हेंबर) सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सायंकाळी सहा ते रात्री बारा यावेळेत सोलापूर रस्त्याने सारसबागेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. स्वारगेट येथील समतल विलगक (ग्रेट सेपरेटर) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. बुधवारी सायंकाळी सहानंतर या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मतदान साहित्य श्री गणेश कला क्रींडा रंगमच येथील मुख्य केंद्रात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे सारसबागेकडे जाणाऱ्या वाहनांनी लक्ष्मीनरायण चित्रपटगृह चौकातून उजवीकडे वळून मित्रमंडळ चौकमार्गे सारसबागेकडे जावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic system in swargate area will changed on tuesday november 19 and wednesday november 20 pune print news rbk 25 sud 02