पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर ट्रेलर उलटला. यात सुदैवाने जीवितहानी झालेले नाही. परंतु, दोनजण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सकाळी साडेअकराच्या सुमारास झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
हेही वाचा – पुणे: हिंदुस्थान पेट्रोलियमची भूमिगत वाहिनी फोडून इंधन चोरी, इंधन माफियासह साथीदार गजाआड
हेही वाचा – तांदळाच्या कोंड्यावर निर्यात बंदी का?
ट्रेलर बाजूला करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या एक तासापासून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. ट्रेलर बाजूला करण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
First published on: 02-08-2023 at 12:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trailer overturned in khandala tunnel on pune mumbai expressway traffic towards mumbai stopped kjp 91 ssb