पिंपरी- चिंचवडमध्ये रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. आकुर्डी- चिंचवड दळवी नगर पुलाखाली रेल्वे रुळावर दगड ठेवण्यात आली होती. सुदैवाने ही बाब अभियांत्रिकी विभागाचे रेल्वे कर्मचारी यांच्यामार्फत  ट्रॅक मेंटेनन्स टेस्टिंगच्या कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली. सध्या रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी चिंचवड मध्ये आकुर्डी चिंचवडच्या दरम्यान रेल्वे रुळावर दगड ठेवल्याचे वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अपघात टळला आहे. ही घटना सव्वा चारच्या सुमारास समोर आली. अप लाईन म्हणजे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दगड रचून ठेवण्यात आली होती. यामुळे रेल्वेचा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळीच ही बाब रेल्वे विभागाच्या रुटीन ट्रॅक मेंटेनन्स वेल्ड टेस्टिंगच्या कामासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली म्हणून मोठा अपघात टळल्याच बोलले जात आहे. घटनास्थळी रेल्वे पोलीस पोचले असून दगड काढले गेलेले आहेत. नेमका हा खोडसाळपणा कोणी केला?. की कुठल्या समाजकंटकाने ही दगडे ठेवली याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत.