केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे आज संध्याकाळी पुण्यात येणार आहेत. उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बहुराज्यीय सहकारी संस्थानासाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात होणार आहे. त्या अगोदर रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहाच्या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा बघायला मिळत आहे.

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज संध्याकाळी ते पुण्यात येणार आहेत. उद्या (रविवारी) चिंचवडमधील रामकृष्ण प्रेक्षकगृहात त्यांच्या हस्ते बहुराज्यीय सहकारी संस्थानासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनीदेखील कंबर कसली असून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस तयारी करत आहेत.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sai Paranjpye Speech
Sai Paranjpye “अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातील तरुणाईला सिनेसाक्षर केलं”, पद्मभूषण सई परांजपेंचे उद्गार
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan news in marathi
साहित्याच्या मांडवात राजकारण्यांची ‘सरबराई’!
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Loksatta editorial US National Security Advisor Jake Sullivan Nuclear deal Narendra Modi
अग्रलेख: अणू हवा,‘अरेवा’ नको!
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो

हेही वाचा – “संसदेवर राजकीय दलालांचे वर्चस्व होते, म्हणून सर्व भ्रष्टाचारी एकत्र आले आणि…” उपराष्ट्रपतीचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

हेही वाचा – अकोलेकरांवर भर पावसाळ्यात जलसंकट; जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार असल्याने प्रेक्षकगृहाच्या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर अमित शहा थांबणार असलेल्या पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते चिंचवड येथील कार्यक्रमस्थळदरम्यान पोलिसांनी ताफ्याची रंगीत तालीम घेतली. चिंचवडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थिती लावणार आहेत.

Story img Loader