बारामती : येथील विमानतळानजीक रेड बर्ड या कंपनीचे शिकाऊ विमान गुरुवारी संध्याकाळी कोसळून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> अमली पदार्थ तस्कर प्रकरणातील आरोपी ललित पाटीलला मदत करणाऱ्या प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

दुपारच्या सुमारास विमान धावपट्टीकडे कूच करत असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात एक वैमानिक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. विमानतळाच्या हद्दीतच विमान कोसळल्याने इतर कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, या अपघातात विमानाचे बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या संदर्भात पोलिसांनी माहिती गोळा करण्यास प्रारंभ केला असून, अपघाताच्या कारणाचीही चौकशी केली जात आहे.