पुणे : पुणे-हरंगुळ-पुणे गाडीला पारेवाडी स्थानकावर आणि पुणे-मिरज -पुणे एक्स्प्रेस गाडीला किर्लोस्करवाडी स्थानकावर प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी गुरुवारपासून पुणे-हरंगुळ-पुणे विशेष गाडीला पारेवाडी स्थानकावर प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला. पुणे-हरंगुळ गाडी स्थानकावर सकाळी ८.०८ वाजता पोहोचेल आणि ८.१० वाजता सुटेल. हरंगुळ-पुणे ही गाडी पारेवाडी स्थानकावर सायंकाळी ६.२३ वाजता पोहोचेल आणि ६.२५ वाजता सुटेल.
हेही वाचा – ‘तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी?’ निलेश लंके म्हणाले, “साहेब सांगतिल तो आदेश..”
हेही वाचा – बारामती : कन्हेरीच्या मारुती दर्शनाने शिवतारे यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा
याचबरोबर पुणे- मिरज -पुणे एक्स्प्रेस गाडीला १९ मार्चपासून किर्लोस्करवाडी स्थानकावर प्रायोगिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे – मिरज एक्स्प्रेस गाडी किर्लोस्करवाडी स्थानकावर सकाळी ११.५३ वाजता पोहोचेल आणि ११.५५ वाजता सुटेल. मिरज -पुणे एक्स्प्रेस गाडी किर्लोस्करवाडी स्थानकावर सायंकाळी ५.०३ वाजता पोहोचेल आणि ५.०५ वाजता सुटेल.