पुणे : पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली आहे. पशुसंवर्धन खात्याची जमीन एमआयडीसीला देण्यास विरोध केल्यामुळे त्यांची बदली झाल्याची चर्चा आहे.

दिवेगावकर यांच्या बदलीबाबतचा आदेश गुरुवारी (५ सप्टेंबर) अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी काढला आहे. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीणकुमार देवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘पशुसंवर्धन विभागाच्या ताब्यात असलेल्या ताथवडे – थेरगाव येथील ७१.९८ हेक्टर जमिनीपैकी ६६.३० हेक्टर जमिनीची एमआयडीसीने मागणी केली होती. पण या जमिनीवर राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत विविध प्रकल्प सुरू असल्यामुळे या जमिनीची पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळाला गरज असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडून राज्य सरकारला देण्यात आला होता,’ अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Screening of Marathi films in theatres Municipal administration responds positively to artists demand Pune news
नाट्यगृहांमध्ये आता मराठी चित्रपटांचे प्रदर्शन; कलाकारांच्या मागणीला महापालिका प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे मंत्रिपदे ?
Moshi International Exhibition Center, garbage dump,
पुणे : मोशीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र कचऱ्याच्या विळख्यात
Vidhan Bhavan premises Central Vista vidhan
विधानभवन परिसराचा कायापालट, अध्यक्षपदी फेरनिवड होताच राहुल नार्वेकर यांचा पुनरुच्चार; सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर विकास

हेही वाचा – सीबीएसईकडून शाळांची अचानक तपासणी; नियमभंग आढळल्यास कठोर कारवाई

हेही वाचा – पिंपरी- चिंचवड: दारू आणि मौज मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या जय-विरुला बेड्या; २१ दुचाकी जप्त

ब्रिटिशांकडून पशुसंवर्धन विभागाकडे ताथवडे-थेरगाव येथील १२३.४१ हेक्टर जागेचे हस्तांतरण झाले होते. या १२३.४१ हेक्टरपैकी ५१.४३ हेक्टर जागा यापूर्वीच यशदा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आली आहे. उर्वरित ७१.९८ हेक्टरपैकी २४ हेक्टरवर शेती, उच्च दाब विद्युत वाहिनी, रहिवास, निळ्या आणि लाल पूररेषेचे आरक्षण आहे. एकूण ७१.४३ हेक्टरपैकी २४ हेक्टर जागेवर विविध बाबींसाठीचे आरक्षण असूनही ६६.३० हेक्टर जागेची एमआयडीसीने, तर ५.१८ हेक्टर जागेची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मागणी केली आहे. संबंधित जागेवर आरक्षण असूनही जागेची मागणी कशी केली, सभोवती दाट लोकवस्ती असूनही एमआयडीसीला ही जागा का पाहिजे, असे सवाल त्यामुळे उपस्थित केले गेले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत दिवेगावकर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी काही बोलण्यास नकार दिला.

Story img Loader