पिंपरी- चिंचवड चे मावळते पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरण भोवलं आहे. त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी विनयकुमार चौबे हे आता पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.

हेही वाचा- अखेर शाईफेक प्रकरणातील तिघांवरील ३०७ कलम हटवले

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर अंकुश शिंदे यांची बदली निश्चित होती अस बोललं जात होतं. त्याला आज पूर्णविराम मिळालेला आहे. त्यांची बदली नाशिकच्या आयुक्तपदी करण्यात आली. याबाबत चे आदेश गृहविभागाने आज काढले आहेत. विनयकुमार चौबे हे अपर पोलिस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या ठिकाणी कार्यरत होते. 

हेही वाचा- शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार

पिंपरी- चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली नाशिक येथे पोलीस आयुक्तपदी झाली आहे. तर, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयाची सूत्रे विनयकुमार चौबे हे हाती घेणार आहेत. एप्रिल महिन्यात आयपीएस कृष्ण प्रकाश यांच्या जागी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली होती. अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत अंकुश शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत अनेकांचे धाबे दणाणून सोडले होते. गुन्हेगारी च्या बाबत देखील चढउतार पाहिला मिळाले. दरम्यान, शनिवार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक फेक करण्यात आली होती. या प्रकरणी अंकुश शिंदे यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन अकरा जणांचं निलंबन करण्यात आलं होतं. तर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. पोलिस आयुक्तालयात शिंदेंबाबत सुप्त नाराजी होती. राजकीय दबावापोटी शाईफेक करणाऱ्या तिघांवर खुनाचा प्रयत्न हे कलम लावल्याचा आरोप देखील त्यांच्यावर होता. नुकतंच अंकुश शिंदे हे मुंबई ला जाऊन आले आहेत. त्यामुळं त्यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. त्याला आज पूर्ण विराम मिळाला असून नाशिक येथे त्यांची वर्णी लागली आहे.

हेही वाचा- ‘महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच’; सुषमा अंधारे यांचा आरोप

राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाने दिले. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली करण्याचे आदेश करण्यात आली. गुप्ता यांना गृहविभागाने अद्याप कोणताही पदभार दिलेला नाही. दरम्यान, सीआयडीचे प्रमुख रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर सीआयडीच्या प्रमुखपदी प्रशांत बुरडे यांची नियुक्ती करण्यात आली.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुंड टोळ्यांना वचक बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा प्रभावी वापर केला होता. गुप्ता यांच्या कार्यकाळात शहरातील ११४ गुंड टोळ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याने जरब बसली. झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. गुप्ता यांच्या कार्यकाळात शहरातील ८१ गुंडांच्या विरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्यांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.