राज्यातील पाेलीस उपायुक्त, अतिरिक्त अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी सायंकाळी दिले. पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील यांची बदली करण्यात आली आहे. पुणे शहरात १६ पोलीस अधिकारी बदलून आले आहेत.

हेही वाचा- पुणे: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कलम १४४ लागू

eknath shinde, eknath shinde resignation, eknath shinde result, eknath shinde news,
मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अन् पुण्यातून ही नावे निश्चित! मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या वाढली
Question marks over Diljit Dosanjh upcoming shows after Kothrud show Pune print news
विरोध मद्यसेवनाला, गोंगाटाला, की कोंडीला? दिलजितच्या कोथरूडमधील कार्यक्रमानंतर…
maharashtra government marathi news
स्वयंचलितरीत्या नामंजूर प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज आता निकाली; प्रस्ताव सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरची मुदत
bhima koregaon commission final argument
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर उद्या अंतिम युक्तिवाद
pune traffic route changes marathi news
पुणे: गोळीबार मैदान चौकातील कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक बदल
maharashtra weather updates marathi news
थंडीचा जोर आणखी वाढणार? काय आहे हवामानतज्ज्ञांचा अंदाज?
sant dnyaneshwar maharaj samadhi sanjeevan sohala
अलंकापुरीत वैष्णवांची मांदियाळी; इंद्रायणी काठ फुलला
pune airport two more international flights
हवाई प्रवाशांना खूषखबर! पुणे विमानतळावरून आणखी दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे

पुणे शहरात बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आणि कंसात कोठून कोठे नियुक्ती झाली पुढीलप्रमाणे

अरविंद चावरिया (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग), संदीप सिंह गिल (राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली, समादेशक ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), राजेश बनसोडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते बिनतारी संदेश विभाग), स्मार्तना पाटील (पोलीस अधीक्षक, बिनतारी संदेश विभाग ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), अमोल तांबे, (पोलीस उपायुक्त, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे ), सुहेल शर्मा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर), प्रवीण पाटील (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे), दीपक देवराज (पोलीस अधीक्षक, राज्य सुरक्षा महामंडळ ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे), शशिकांत बोराटे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलीस उपायुक्त, पुणे), आनंद भोईटे (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विक्रांत देशमुख (अतिरिक्त पोलीस अधीक्षक जालना ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर), राजलक्ष्मी शिवणकर (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे), अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर), स्वप्ना गोरे, (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पिंपरी-चिंचवड), विजयकुमार मगर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर).

हेही वाचा- शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मुलीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

प्रियंका नारनवरे (पोलीस उपायुक्त पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, नागपूर), भाग्यश्री नवटके (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, चंद्रपूर), पौर्णिमा गायकवाड (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली), नम्रता पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई), राहुल श्रीरामे (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई), सागर पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते उपायुक्त, अमरावती शहर), विवेक पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड)