: नगर रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारातील रोहित्राला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. रोहित्राला आग लागल्यानंतर सोसायटीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने रहिवासी भयभीत झाले. चंदननगर भागात विशालदीप रेसीडन्सी सोसायटीच्या आवारात रोहित्र आहे. रविवारी दुपारी सोसायटीच्या आवारात आग लागली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर येरवडा अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रोहित्रातील डिझेलने पेट घेतल्यानंतर आग भडकली. मोठ्या प्रमाणावर काळा धूर झाल्याने रहिवासी भयभीत झाले. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा