धोका टाळण्यासाठी उपाययोजना

विजेच्या ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या उडून आग लागण्याचे किंवा इतर धोका निर्माण होण्याच्या घटना लक्षात घेता लोकवस्तीजवळ असलेल्या ट्रान्सफॉर्मरला लोखंडी पत्र्याचे सुरक्षा आवरण लावण्यात आले आहे. पुणे व पिंपरी- चिंचवड शहरासह मुळशी, मंचर आणि राजगुरुनगर विभागात वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या ६९० ट्रान्सफॉर्मर्सना सुरक्षा आवरण लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे धोका टाळण्यास मदत होऊ शकणार आहे.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई

ट्रान्सफॉर्मरमधून ठिणग्या पडून घराला आग लागण्याच्या घटना विविध ठिकाणी घडल्या आहेत. चिंचवडला ट्रान्सफॉर्मरच्या आगीत एकाचा मृत्यूही झाला होता. हे प्रकार लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने हा उपाय करण्यात आला आहे. याबाबत महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी सांगितले, की  पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागातील सुमारे ७४४ धोकादायक  ट्रान्सफॉर्मरची निवड करण्यात आली. गणेशिखड मंडलातील पिंपरी, कोथरूड, भोसरी, शिवाजीनगर विभागात एकूण ३५२  ट्रान्सफॉर्मरला, तर रास्तापेठ मंडलातील नगररोड, पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन विभागांत एकूण १३७  ट्रान्सफॉर्मरला लोखंडी पत्र्यांची सुरक्षा आवरणे लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. ट्रान्सफॉर्मरच्या चारही बाजूने व खालच्या दिशेने सुरक्षा आवरण लावल्याने ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, ऑईल गळती, स्पार्किंग आदींबाबतचा धोका कमी होऊ शकेल.

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरला संरक्षक जाळ्या लावल्या आहेत. मात्र,अनेक ठिकाणी  ट्रान्सफॉर्मरच्या कुंपणात कचरा टाकला जातो. त्यामुळे काही प्राणी तेथे येतात. त्यांचा यंत्रणेशी संपर्क आल्यास प्राण्यांचा जीव जाण्याबरोबरच यंत्रणाही ठप्प होते. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या ट्रान्सफॉर्मरसह वीजयंत्रणेपासून सावध व सतर्क राहावे. वीजयंत्रणेच्या परिसरात कचरा टाकण्याचे टाळावे, असे आवाहनही मुंडे यांनी केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी होणारा धोका टाळण्याच्या दृष्टीने शहरात ट्रान्सफॉर्मर्सना सुरक्षा आवरण लावण्यात आले आहे.