पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी २४ तास वाहन तपासणी करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सोमवारी दिले. परिवहन आयुक्त भिमनवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी आयेजित करण्यात आली. या बैठकीत रस्ते सुरक्षा आणि राज्यातील विविध महामार्गांवर झालेल्या अपघातांच्या घटनांचा आढावा घेण्यात आला. त्या वेळी द्रुतगती मार्गावरील अपघात रोखणे तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना याबाबत सेव्ह लाइफ फाउंडेशन आणि ब्लूमबर्ग संस्थेकडून काम करण्यात येेत आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींकडून बैठकीत रस्ते सुरक्षा तसेच उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातांबाबत या संस्थेच्या प्रतिनिधींकडून सादरीकरण करण्यात आले. द्रुतगती मार्गावर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा