वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्याला बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) जबाबदार नाही, असा दावा पुणे शहरातील वाहतूक तज्ज्ञांनी केला आहे. त्या संदर्भातील निवेदन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पुणे-मुंबई मार्गावरील बहुतांश रेल्वे गाड्या २० नोव्हेंबरला रद्द; १९ आणि २१ नोव्हेंबरलाही वाहतुकीवर परिणाम

शहरातील वाहतूक कोंडीला बीआरटी मार्ग जबाबदार असून तो काढून टाकावा आणि अनावश्यक सायकल मार्गही काढावेत, असे पत्र पोलिसांकडून महापालिकेला देण्यात आले होते. त्यातच महापालिकनेही मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक क्षेत्रात काम करणारे सेव्ह पुणे ट्रॅफिक मूव्हमेंटचे हर्षद अभ्यंकर, वाहतूक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे, परिसरचे रणजित देशपांडे यांनी त्या संदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यामध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडी होत असल्याचे निवेदन त्यांनी दिले.